आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीबीमुळे मिळत नव्हते पोटभर जेवण, आज आहे अनंत अंबानीचा फिटनेस ट्रेनर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजिव अनंत अंबानी सध्या चर्चेत आहे. अनंतने तब्बल 108 किलो वजन कमी केले आहे. अनंतसोबतच त्याचा फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना याची देखील सर्वत्र वाह वाह होत आहे. विनोद प्रचंड हालाखीचे आयुष्य जगला आहे. गरीबीमुळे त्याला पोटभर जेवणही मिळत नव्हते. विनोदने आज मात्र आपल्या मेहनतीच्या जोरावर शुन्यातून विश्व निर्माण केले आहे. अनंतचा फिटनेस ट्रेनर म्हणून विनोद आज जगासमोर आला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये अनंतने वजन कसे कमी केले, याचा खुलासा विनोद चन्नाने केला.

- विनोद चन्ना हा अनंतचा फिटनेस ट्रेनर आहे. विनोदने आतापर्यंत बॉलिवुडमधील अनेक सेलेब्सलाही फिटनेस ट्रेनिंग दिले आहे.
- मुंबईतील खार एरियात 'व्हीसी फिटनेस' नामक त्याचे फिटनेस सेंटर आहे.
- मिडिल क्लास फॅमिलीत जन्मलेल्या विनोदचा फिटनेस ट्रेनर बनण्याचा प्रवास अत्यंत संघर्षपूर्ण राहिला.
- घरी अठराविश्व दारिद्यांमुळे त्याला एकवेळचे जेवण मिळत होते. ते मिळवतानाही त्याला प्रचंड परिश्रम घ्यावे लागत होते.

विनोद कसा बनला फिटनेस ट्रेनर...
-विनोद एकेकाळी खूप दुबला पतला होता. मि‍त्र 'सुकडा' म्हणून त्याची खिल्ली उडवायचे.
- विनोदला बॉडी बनवायची होती. मात्र, पैसे नसल्याने तो जिमची फी भरू शकत नव्हता.
- शिक्षणासोबतच विनोद छोटे-मोठे काम करू लागला.
- 50 रुपये प्रति महिना फी भरून विनोदने आधी जिम जॉईन केले.
- प्रोफेशनल ट्रेनर बनण्यासाठी विनोदने ट्रेनिंग घेतली व विनोद फिटनेस ट्रेनर बनला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, असे कमी केले अनंत अंबानीने वजन...
बातम्या आणखी आहेत...