आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणच्या नावाचा या अॅक्ट्रेसने केल गैरवापर; 45000 लोकांना 200 कोटींना गंडवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या नावाचा गैरवापर करुन सुमारे 200 कोटींची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने या टोळीचा पर्दाफाश केला आहे. धक्कादाक म्हणजे या टोळीत मॉडेल आणि अभिनेत्री अनारा गुप्ता हीचे नाव समोर आले आहे.  अनारा फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहे.

 

अनारा यामुळे आहे चर्चेत...

- भोजपुरी अभिनेत्री अनारा गुप्तावर फ्रॉड कंपनी बनवून तब्बल 45,000 लोकांकडून 200 कोटींहून जास्त रक्कम उकळल्याचा आरोप आहे. ती फरारही होती. तिच्या मुंबईतील फ्लॅटवरही टाळे होते.
- एसटीएफ अलाहाबादचे एएसपी प्रवीणसिंग चौहान म्हणाले, फ्रॉड कंपनीचे फाउंडर मेंबर राहिलेल्या शत्रुघ्न सिंह याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे. मागच्या 3 दिवसांत ही दुसरी अटक आहे, याआधी अलाहाबादच्या ओमप्रकाश यादवला अटक करून तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. 2 डिसेंबरला अनारा एका खासगी चॅनलला बोलताना म्हणाली होती की, जर मी काही केले असते, तर मी देशात राहिले नसते, विजय माल्यासारखी पळून गेले असते.

 

काय आहे हे प्रकरण...?
- टोळीतील बनावट दिग्दर्शक ओमप्रकाश यादव याला अलाहाबाद एसटीएफने अटक केल्यानंतर अनार गुप्ता हिचे नाव चव्हाट्यावर आले.
- पोलिसांनी ओमप्रकाश यादव याला अलाहाबाद सिव्हिल लाइन्स परिसरातून अटक केली.
- टोळीने जवळपास 45 हजार लोकांची फसवणूक केली आहे.
- ओमप्रकाशकडून मोबाइल, लॅपटॉप जप्त केला आहे.
- अनारा आणि ओमप्रकाशचे व्हॉट्‍सअॅप संभाषणही पोलिसांच्या हाती लागले आहे.

 

अजय देवगणच्या नावाचा असा गैरवापर
- अनारा गुप्तासह तिच्या सहकार्‍यांनी 'इम्पेरर मीडिया अॅण्‍ड एंटरटेनमेंट प्रा.लि' नावाचे एक प्रोडक्शन हाऊस सुरु केले.
- अभिनेता अजय देवगण याच्यासोबत एक चित्रपट बनवणार असल्याचे खोटे सांगून अनेकांना गंडा घातला.
- चित्रपट रिलिज झाल्यानंतर कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक आठवड्याला 6 ते 10 टक्के शेअर देईल, असे प्रलोभन दाखवले.
- गुंतवणूकदारांनी विश्वास ठेऊन मोठ्याप्रमाणात पैसा गुंतवला होता.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अनारा गुप्ताचे निवडक फोटो...

बातम्या आणखी आहेत...