आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ancient India Had Planes, Says Captain Anand J Bodas At Indian Science Congress

प्राचीन भारतीयांनी बनवलेली विमाने परग्रहावर जायची- कॅप्टन बोडस यांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विमानाचा शोध 1903 साली लागला असला तरी त्याच्या 7 हजार वर्षापूर्वी भारतीयांनी त्याचा शोध लावला होता. ही विमाने इतकी तंत्रकुशल होती की ती एका गृहावरून दुस-या गृहावर उड्डाण करायची असा दावा पायलट ट्रेनिंग सेंटरचे निवृत्त प्राचार्य कॅप्टन आनंद बोडस यांनी केला आहे.
मुंबईत सध्या 102 वी इंडियन सायन्स काँग्रेस सुरु आहे. यात प्राचीन व पौराणिक काळातील भारतीय विज्ञान या विषयावर परिसंवाद झाला. त्यात बोडस यांनी दावा केला आहे. मात्र, बोडस यांचा दावा अमेरिकेतील नासाच्या एका शास्त्रज्ञाने फेटाळून लावत आक्षेप नोंदवला आहे. या विषयी नासाच्या या संशोधकाने ऑनलाईन पिटीशन दाखल केली आहे.
बोडस यांनी केलेल्या दाव्यानुसार, विमानाचा शोध राइट बंधूंनी नव्हे तर 7 हजार वर्षापूर्वींच भारतीयांनी लावला होता. जगातील पहिले विमान हे महर्षि भारद्वाज ऋषींनी तयार केले होते. या प्राचिन काळी बनविण्यात आलेल्या विमानाला 40 इंजिने होती. ही विमान कोणत्याही दिशेने सहजपणे फिरत असायची. तसेत एका गृहावरून दुसऱ्या गृहावर ही विमाने सहज उड्डाण भरत असत असा दावा बोडस यांनी केला आहे.
प्राचीन भारतीय विमानाचा उल्लेख वेदामध्ये असल्याचे सांगत बोडस म्हणाले की, विमानाचा इतिहास दोन भागात विभागला आहे. ऑफीशियल आणि अनऑफीशियल असा हा इतिहास आहे. 1903 साली राईट बंधुंनी लावलेला शोधाची नोंद ही ऑफीशियल इतिहास आहे. तर 7 हजार वर्षापूर्वी महर्षी भारद्वाज यांनी तयार केलेली विमाने अनऑफीशियल इतिहास आहे. प्राचीन भारतीय विमानातील हवा बाहेर काढणारी यंत्रणा अधिक सोपी होती. आताच्या विमानांमध्ये तर ही यंत्रणाच नाही. ऋषी भारद्वाज यांनी या विषयावर 97 पुस्तके लिहिली. यात रडारपासून वैमानिकाचा आहार, गणवेश कसा असावा याबाबत माहिती दिली आहे. त्या काळी वैमानिकांचा आहार संपूर्ण शाकाहरी होता तर गणवेश समुद्रातील वनस्पतींपासून बनविण्यात आले होते असा दावा केला.
विमानांच्या बांधणीकरिता आपण जे विविध मिश्रधातू परदेशातून आता आयात करीत आहोत त्यांचा उल्लेख आपल्या 'विमानसंहिता' या पुस्तकात भारद्वाज यांनी केला आहे, असा दावा बोडस यांनी केला. आताच्या तरुणांनी पुराणांच्या आधारे सध्याच्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नवी विमान बनवण्याचे आवाहनही बोडस यांनी केले.
पुढे वाचा, आनंद बोडस यांच्या दाव्यामुळे सायन्स काँग्रेसला वादाची किनार....काहींनी केले समर्थन तर काहींनी केला तीव्र विरोध...