आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 कोटींचा विमा असलेला बाप्पा... \'अंधेरीचा राजा\', भक्तांनाही कव्हर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावर्षी 'अंधेरीचा राजा'ला राज्यातील प्रसिद्ध बल्लाळेश्वर मंदिराचा लुक दिला जात आहे. (सौजन्य - फेसबूक पेज) - Divya Marathi
यावर्षी 'अंधेरीचा राजा'ला राज्यातील प्रसिद्ध बल्लाळेश्वर मंदिराचा लुक दिला जात आहे. (सौजन्य - फेसबूक पेज)
मुंबई - सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबईचे गणेश मंडळ आता विमा करण्यासाठी उत्साही झाले आहेत. मायानगरीतील दुसरे सर्वात लोकप्रीय गणपती 'अंधेरीचा राजा'ची घटस्थापना करणाऱ्या या गणेश मंडळाने तब्बल 5 कोटींचा विमा काढला आहे. अंधेरीचा राजा चे दर्शन करण्यासाठी येणाऱ्या लाखो भक्तांमध्ये दिग्गज नेते आणि अभिनेत्यांचा देखील समावेश आहे. आपल्या लाडक्या गणरायाचे स्टेज सजवण्यासाठी हे मंडळ दरवर्षी लाखो रुपये खर्च करत आला आहे.
 
 
'अंधेरीचा राजा' गणेश मंडळाने दिव्य मराठीला दिलेल्या माहितीनुसार, नैसर्गिक संकटांमुळे होणारे संभावित नुकसान, हल्ले इत्यादींसह इतर प्रकारचे धोके टाळण्यासाठी आम्ही विमा उतरवला आहे. सरकारी विमा कंपनी नॅशनल इंश्योरन्स कंपनी लिमिटेडने हा विमा केला आहे. यात बाप्पांना भेट दिल्या जाणाऱ्या आणि सजवण्यासाठी लावलेले दागिणे विम्यात समाविष्ट आहेत. गेल्या वर्षी भक्तांनी बाप्पांना कोट्यवधींचे दागिणे अर्पित केले होते. या विम्याचा प्रीमियम 90 हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे. 
 

गतवर्षी काढला दीड कोटींचा विमा
- 'अंधेरीचा राजा' गणेश मंडळाच्या सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी गेल्या वर्षी 1.5 कोटींचा विमा उतरवला होता. यावर्षी तो चक्क 5 कोटी रुपये एवढा करण्यात आला आहे. 
- दरवर्षी वाढणाऱ्या भक्तांच्या गर्दीमुळे विम्याची रक्कम वाढवण्यात आली आहे असेही मंडळाने स्पष्ट केले. 
- बॉलिवुड अभिनेत्री प्रियांका चोप्रा, शिल्पा शेट्टी, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह अनेक नावाजलेले भक्त या बाप्पांच्या दर्शनाला येतात. मांडवात तैनात असलेल्या कार्यकर्त्यांसह भक्तांना सुद्धा या विम्यात कव्हर देण्यात आला आहे. 
- यावर्षी 'अंधेरीचा राजा'ला राज्यातील प्रसिद्ध बल्लाळेश्वर मंदिराचा लुक दिला जात आहे. यंदा गणेशोत्वात आणखी मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा या गणेश मंडळाने व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...