आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anganwadi Lady Servents Very Soon Get Pension Prithiviraj Chavan

अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीवेतनाबाबत लवकरच निर्णय घेऊ - पृथ्‍वीराज चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या निवृत्तिवेतनाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी त्यांच्या शिष्टमंडळास दिले. सेविकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यावर निवृत्तिवेतनाचा सकारात्मक निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल. तसेच मानधनवाढीबाबत महिला व बाल विकास विभागाकडून प्रस्ताव आल्यानंतर चर्चा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अपंगांसाठीची उत्पन्न मर्यादा शिथिल करणार : अपंगांसाठीच्या विविध योजनांमधील उत्पन्नाची मर्यादा संपूर्ण विचार करूनच काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी चर्चा करताना त्यांनी मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिली.
या वेळी ते म्हणाले की, वसतिगृहामध्ये अपंगांना तीन टक्के आरक्षण, अपंग व्यक्तीसोबत विवाह करणा-यास प्रोत्साहनपर साहाय्य, निवासी आणि व्यवसायासाठी गाळे देण्यासाठी आरक्षण, अपंगांना सानुग्रह मदतीमध्ये वाढ करावी, जिल्हास्तरावर वेगळी शासन यंत्रणा निर्माण करावी, मूकबधिरांना इतर अपंगांप्रमाणे वाहनभत्ता देण्यात यावा, अपंगांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, पोषण आहार देण्यात यावा, विशेष शाळांचे अनुदान देण्यात यावे आदी मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री यांनी सविस्तर चर्चा केली.