आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anganwadi Sevika Get 2 Thousand 450 Rupee Stipend

अंगणवाडी सेविकांना २,४५० रु. मानधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात अनुक्रमे ९५० रुपये आणि ५०० रुपयांची वाढ केली आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५५० रुपयांनी वाढवण्यात आले आहे.राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. ते म्हणाले, ही वाढ एप्रिल २०१५ पासून लागू होईल. अंगणवाडी सेविकांचे राज्यातील एकूण वार्षिक मानधन ८९२.४ कोटी रुपये आहे.

महिला आणि बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या पुरवणी मागण्यांत २२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मानधन वाढीची घोषणा एप्रिल २०१४ मध्ये केली होती, पण त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली नव्हती. आम्ही गेल्या वर्षीचीही वाढ देऊ आणि त्यासाठी पुरवणी मागण्यांद्वारे तरतूदही करू.

राज्यात सध्या अंगणवाडी कार्यकर्तींची ९७ हजार ४७५ पदे मंजूर आहेत, तर ९५,४७५ पदे भरली गेली आहेत. मदतनिसांची ९७ हजार ४७५ पदे मंजूर असून ९२ हजार २३ पदे भरली गेली आहेत. मिनी अंगणवाडी सेविकांची ११ हजार १७५ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ९ हजार ८९८ पदे भरली गेली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मानधनवाढीची मागणी हाेत हाेती.