आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Ambani Cleaned The Roads At Church Gate, Mumbai In Early Morning.

PHOTOS: उद्योगपती अनिल अंबानींनी भल्या पहाटे मुंबईत हातात घेतला झाडू!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- उद्योगपती अनिल अंबानी यांनी बुधवारी पहाटे मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनबाहेर स्वच्छता केली)
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर 'स्वच्छ भारत अभियान'ला सुरुवात करीत देशातील प्रतिष्ठित मंडळींना स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला आता चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी पहाटे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी झाडू हातात घेतल्यानंतर आज पहाटे उदयोगपती अनिल अंबानी यांनी मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनजवळ हातात झाडू घेत स्वच्छता केली.
नरेंद्र मोदींनी 2 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन, मेरी कोम, शोभा डे, प्रसून जोशी, शेखर गुप्ता, सानिया मिर्झा, नागार्जुन, सचिन तेंडुलकर, प्रियंका चोप्रा, शशी थरूर, बाबा रामदेव,कमल हसन, मृदला सिन्हा, आमिर खान आदींसह प्रतिष्ठित मंडळींना स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. त्याला आता अनिल अंबानी यांनीही प्रतिसाद दिला आहे. नरेंद्र मोदींच्या गुडबुकमध्ये सामील होण्यासाठी अंबानींचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
पुढे पाहा, अनिल अंबानींनी भल्या पहाटे मुंबईत केलेल्या स्वच्छतेची छायाचित्रे...