आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: रात्रीच्या अंधारात मुंबईच्या रस्त्यांवर अनिल अंबानींनी लावला झाड़ू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुंबईच्या रस्त्यांवर झाडू लावताना अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे मालक अनिल अंबानी)

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ रत्नांमध्ये सहभागी झालेले अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (एडीएजी) मालक अनिल अंबानी यांनी रात्रीच्या अंधारात मुंबईतील रस्त्यांवर झाडू लावला. अनिल अंबानी यांच्यासह डझनभर लोकांनी मुंबईतील चर्चगेट स्टेशन बाहेरचा परिसर स्वच्छ केला.

पंतप्रधान मोदी यांनी दोन ऑक्टोबरला अनिल अंबानी यांनरी स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
अनिल अंबानी यांच्यासह मेरीकॉम, सानिया मिर्जा, ऋतिक रोशन, तेलुगु सुपरस्टार नागार्जुन आणि देशातील रनर्स क्लबला 'क्लीन इंडिया चॅलेंज' देण्यात आले आहे.

मोदी यांच्या नऊ रत्नांमध्ये अनिल अंबानी यांच्यासह अभिनेता सलमान खान, अभिनेत्री प्रियंका चोप्रा, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, गोवाचे राज्यपाल मृदुला सिन्हा, कॉंग्रेसचे खासदार शणी थरूर, योग गुरु बाबा रामदेव, अभिनेता-निर्माता कमल हसन आणि टेलीव्हिजन मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ची टीमचा सभावेश आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, अनिल अंबानी यांची छायाचित्रे...