आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Major Security Breach In Mumbai Unidentified Man Shares Stage With Pm

मुंबईत पंतप्रधानांची सुरक्षा भेदणा-या अनिल मिश्राला अटक, पोलिस कोठडीत रवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 31 ऑक्टोबरला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या शपथविधी दरम्यान पंतप्रधानांची सुरक्षा भेदून व्यासपीठावर पोहचणा-या व फोटो काढून हौस भागवणा-या अनिल मिश्रा या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अनिल मिश्राला 11 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत भाजपचे कार्यकर्ते संजय बेडिले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्यासह देशभरातील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. या शपथविधीला सर्वच स्तरातील मान्यवरांनी निमंत्रित करण्यात आले होते. पण ऐनेवेळी सुरक्षेच्या कारणास्तव काही मान्यवरांना शपथविधीला सोडले गेले नव्हते. तरीही अनिल मिश्रा या महाभागाने थेट व्यासपीठावर पोहचण्याचा पराक्रम केला होता. अनिस मिश्रा हा स्वत:ला मुंबई भाजपच्या बिहार सेलमधला स्वंयघोषित सदस्य आहे. तरीही तो भाजपच्या बड्या नेत्यांसोबत व्यासपीठावर आढळून आला. होता. अनिल मिश्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यासोबत फोटोही काढले आहेत. इतकेच नाही तर शपथविधी सोहळा सुरू असताना अनिल मिश्रा व्यासपीठावर मोदींच्या मागे-मागे फिरत असल्याचे व्हिडिओ व फोटोजमधून दिसून येत आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पंतप्रधान मोदी असताना झेड सुरक्षा भेदून तो तिथपर्यंत पोहचला होता. अनिल मिश्राचे नाव व्यासपीठावर किंवा व्हीव्हीआयपी अशा कोणत्याही यादीत नव्हते. एवढेच नव्हे तर अनिल मिश्राला प्रवेशाचा पासही देण्यात आला नव्हता, असे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
पुढे पाहा, स्वंयघोषित भाजपच्या या कार्यकर्त्याने कोणा-कोणासमवेत काढले फोटो व भागवली हौस....