आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानपरिषदेत शिवसेनेच्या गट नेतेपदी अनिल परब यांची नियुक्ती, सभापतींची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधानपरिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदी अनिल परब यांची नियुक्ती करण्‍यात आली आहे. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभागृहात आज (शुक्रवारी) अनिल परब यांच्या नावाची घोषणा केली. याआधी विधानपरिषदेच्या शिवसेना गटनेते म्हणून दिवाकर रावते हे  काम पाहात होते.

अनिल परब यांना बक्षिसी..
नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनिल परब यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. त्यामुळेच शिवसेनेला आपला गड कायम राखता आला होता. तसेच वांद्रे पूर्व विधानसभाच्या पोटनिवडणुकीत परब यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्याचेच बक्षीस म्हणून अनिल परब यांना विधानपरिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदी वर्णी लागल्याची चर्चा सुरु आहे.
बातम्या आणखी आहेत...