आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेश खन्ना संपत्ती प्रकरणी अनिता अडवाणींची याचिका कोर्टाने फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- राजेश खन्नांच्या शेवटच्या दिवसात अनिता आडवाणींसोबत छायाचित्र)
मुंबई- दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांची लिव्ह इन पार्टनर अनिता अडवाणींची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. अनिता या राजेश खन्ना यांची पत्नी नाही तसेच त्या कुटुंबातील सदस्यही नाहीत, असे सांगत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. अनिता अडवाणी यांनी राजेश खन्ना यांनी तयार करून ठेवलेल्या मृत्यूपत्राची आपल्याला एक प्रत (कॉपी) मिळावी अशी याचिकेद्वारे मागणी केली होती. मात्र, कोर्टाने आता ती फेटाळून लावली आहे. त्यामुळे राजेश खन्नाच्या शेवटच्या आठ-दहा वर्षाच्या कालखंडात त्यांच्यासोबत राहणा-या अनिता आडवाणींना धक्का बसला आहे.
बुधवारी मुंबई हायकोर्टाचे न्यायाधिश आर डी धानुका यांनी अनिता यांना राजेश खन्नांच्या मृत्यूपत्राची एक प्रत देण्यास आदेश दिले होते. त्याला राजेश खन्ना यांची थोरली मुलगी व अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिने आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी झाली. हायकोर्टाचे मुख्य न्यायाधिश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान अडवाणींची मागणी फेटाळून लावली.
ट्विंकलचा वकील वीरेंद्र सराफचे म्हणणे होते की, आडवाणी यांना राजेश खन्ना यांच्या मृत्यूपत्राची प्रत देण्याचा प्रश्नच येत नाही. कारण त्या राजेश खन्नांच्या कौटुंबिक सदस्य नाहीत तसेच त्यांच्याकडे तसे कोणतेही अधिकार नाहीत. दुसरीकडे, अनिता आडवाणींचे म्हणणे आहे की, काकांनी आपल्या आशीर्वाद बंगल्याचे स्मारक उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच त्याचा उल्लेख मृत्यूपत्रात असू शकतो.
अनिता अडवाणी यांनी राजेश खन्ना यांच्या कुटुंबावर याआधीच घरगुती हिंसाचार कायद्यातंर्गत तक्रार दाखल केलेली आहे.