मुंबई- सीएसटी रेल्वे पोलिसांच्या (आरपीएफ) महिला स्वच्छतागृहात एका 23 वर्षीय युवतीने गुरुवारी स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली असतानाच आता या प्रकरणात नवी माहिती पुढे येऊ लागली आहे. अनिता पटेल असे या युवतीचे नाव असून ती डोंबिवलीत राहत होती. डोंबिवली पश्चिम भागातील सायली अपार्टमेंटमध्ये आपल्या आईवडिलांसमवेत अनिता रहात होती.
रेल्वे प्रशासनाकडे केवळ 40 हजार रूपये आमचे अडकले होते. त्यामुळे एवढ्या छोट्या कारणामुळे ती आत्महत्या करू शकत नाही. अनिताने रेल्वे अधिका-याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. अनिताच्या खोलीत तिच्या वडिलांना एक चिठ्ठी सापडली असून, त्यात रेल्वे अधिका-यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यात तिने म्हटले आहे. या चिठ्ठीत छळ करणा-या रेल्वे अधिका-यांची नावेही तिने या चिठ्ठीत लिहिलेली आहेत. आता तिच्या वडिलांकडून घेतलेली चिठ्ठी घेऊन आरपीएफ पोलिस अधिक माहिती घेणार आहेत. अनिताने लिहिलेली चिठ्ठी सापडल्याने या प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे.
अनिताबाबत आणखी पुढे वाचा...