आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेने राखी सावंतला उमेदवारी घोषित करावी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा आयटम गर्ल राखी सावंत चांगले सरकार व प्रशासन चालवू शकते असे उद्धव ठाकरेंना वाटत असेल तर त्यांनी राखीला आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करावे, अशी उपरोधिक टीका आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
केजरीवाल यांच्यापेक्षा आयटम गर्ल राखी सावंत चांगले सरकार चालवू शकेल असे 'सामना'च्या अग्रलेखात भूमिका मांडत केजरीवाल व आम आदमी पक्षावर टीकेची झोड उठविली होती. त्याला प्रत्त्युत्तर आपने दिले आहे. याबाबत अजंली दमानिया म्हणाल्या, शिवसेनेसारख्या पक्षाकडून यापेक्षा वेगळी काय अपेक्षा व्यक्त केली जावू शकते. शिवसेनेसारख्या पक्षाला नेत्यांची गरज आहे. राखी सावंत एक चांगली कलाकार आहे. तिनेही राजकारणात यावे आमची काय हरकत असणार नाही. आमची राजकीय संस्कृती काढणा-यांची काय संस्कृती आहे हे सर्वांना माहित आहे. शिवसेनेला केजरीवालांपेक्षा राखी सावंत योग्य वाटत असेल तर त्यांनी तिला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करावे.
वाचा पुढे...होय, उद्धव ठाकरे योग्यच बोलले, उद्धव-राज माझ्यासाठी भाऊ- राखी सावंत