आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या एसअायटी चाैकशीची मागणी करणार : अंजली दमानिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे एक नव्हे, तर अनेक आरोप आहेत. भोसरी जमीन प्रकरण तसेच कुख्यात डाॅन दाऊदशी कथित संभाषण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी आम्ही गप्प बसणार नाहीत. खडसेंच्या २३ गैरव्यवहार प्रकरणांत आम्ही हायकाेर्टात याचिका दाखल करून एसआयटी चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली आहे.

दमानिया नुकत्याच जळगावला गेल्या होत्या. ‘तिथे अनेक व्यक्ती, संस्थांकडे केलेल्या चाैकशीत खडसेंनी २३ प्रकरणांमध्ये गैरव्यवहार केल्याचे आढळून आले असून या सर्व प्रकरणांची कागदपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी वाचवण्याचा िकतीही प्रयत्न केला तरी खडसेंचा खरा चेहरा अाम्ही लाेकांसमाेर अाणू,’असे त्यांनी सांगितले.

‘भोसरी जमीन प्रकरणात खडसेंना क्लीन चिट दिली तर मग अजून खडसेंचा पीए गजानन पाटील तुरुंगात का आहे? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे. दाऊदशी संभाषणाविषयी माध्यमांनी अनेक पैलू समोर आणले असून जानेवारी ते एप्रिल महिन्यांची मोबाइल बिले उघड केल्यास यातून खूप गोष्टी बाहेर येऊ शकतील. पण या दोन्ही प्रकरणांत खडसेंना क्लीन िचट देऊन मुख्यमंत्री पाठीशी घालत आहेत. संत मुक्ताई साखर कारखाना तसेच अादिवासी जमीन हडप करण्याच्या प्रकरणामुळे खडसे अडचणीत येणार हे निश्चित,’ असेही दमानिया म्हणाल्या.

न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी
भूखंडप्रकरणी खडसे यांची चौकशी करण्यासाठी नागपूर येथील निवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची नियुक्ती करणारा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सोमनाथ बागूल यांच्या स्वाक्षरीने गुरूवारी जारी करण्यात अाला. ‘ज्या भूखंडाबाबत माजी महसूलमंत्र्यांवर आरोप झाले त्या भूखंडाची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली होती का? ही जमीन एमआयडीसी कायदा वा अन्य कायद्यांतर्गत हस्तांतरणीय होती का? विक्रीपात्र आहे का? या जमिनीची विक्री वा हस्तांतरप्रकरणी पदाचा दुरूपयोग झाल्याचे दिसते का? ’ या मुद्द्यांवर झोटिंग समितीला तीन महिन्यांत चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. खडसे यांनीही हेच मुद्दे उपस्थित करून आपण निर्दोष असल्याचे सांगितले हाेते.
बातम्या आणखी आहेत...