आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंविरोधात कारवाई करायला मुख्यमंत्री घाबरतात; अंजली दमानिया यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. - Divya Marathi
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया.
मुंबई-सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही, असा आरोप केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंविरोधात अश्लील टिप्पणीची तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने दमानियांनी हा आरोप केला आहे.  आपल्याबाबत  असभ्य आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणीही त्‍यांनी  मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस आणि राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार अर्जाद्वारे केली अाहे.  
 
एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी जळगावात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात खडसे यांनी आपल्याविषयी अतिशय असभ्य आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. या अगोदरही दोन वेळेस त्यांनी आपल्याविरोधात असभ्य भाषेत टीका केली  होती.  मात्र या वेळी वापरलेली भाषा ही एका महिलेचा मानभंग करणारी असून त्याबद्दल त्यांच्या विरोधात कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण जळगावचे पोलिस अधीक्षक दत्ता कराळे यांच्याकडे केल्याचे दमानिया  यांनी सांगितले. आपल्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी एकनाथ खडसेंच्या भाषणाची चित्रफीतही आपल्या तक्रारी सोबत जोडली आहे. तसेच जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडेही लेखी तक्रार केल्याचेही त्या म्हणाल्या. दमानिया यांनी प्रसिद्धिपत्रकातही खडसेंना उद्देशून काही सवाल केले आहेत. आपण केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात बोलल्याने आपण एका महिलेबाबत अशी खालच्या पातळीवर जाऊन विधाने केली आहेत का? तसेच हीच आपली संस्कृती आहे का? असा सवालही दमानिया यांनी खडसे यांना विचारला आहे.  दरम्यान, या वक्तव्याविरोधात दमानिया समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
  
यूट्यूबवरील भाषणाची चित्रफीत गायब  
आरोपांच्या पुष्ट्यर्थ दमानिया यांनी खडसेंच्या कथित भाषणाची एक चित्रफीत आपल्या तक्रार अर्जासोबत जोडली होती. ही चित्रफीत आज सकाळपर्यंत यूट्यूबवर होती. मात्र दुपारनंतर अचानकपणे ही चित्रफीत यूट्यूबवरून गायब झाली आहे. याबाबत आपल्या टि्वटर हँडलच्या माध्यमातून दमानिया यांनी त्यावरही भाष्य केले. ‘एफआयआर दाखल होण्याच्या भीतीने खडसेंनी यूट्यूब लिंक डिलिट केली. मात्र आमच्याकडे ती चित्रफीत डाऊनलोड केलेली असल्याने खडसेजी, वाटेल ते करा. शिक्षा ही होणारच’अशा शब्दांत त्यांनी खडसेंना थेट आव्हान दिले आहे.
 
काय म्हणाल्या अंजली दमानिया
खडसेंकडे सगळ्यांची अंडी-पिल्ली असल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही, असे दमानिया म्हणाल्या. पुरोगामी महाराष्ट्रात, मुंबईत एकही महिला सुरक्षित नाही असे त्यांनी म्हटले आहे. आपण मुख्यमंत्री, देवेन भरती, एसीपी, डीसीपी अशा सगळ्यांविरोधात कोर्टात जाऊन लढणार असल्याचेही दमानियांनी सांगितले. एक महिलेवर अन्याय झाला तरीही एफआयआर दाखल करत नाही. हा कर्तव्यात हलगर्जी असल्याचा दावाही दमानियांनी केला. खडसेंविरोधात दमानियांच्या तक्रारीनंतर जळगाव पोलिस प्रकरणाची चौकशी करणार आहेत. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...