आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नारायण राणे लीलावतीमध्ये अॅडमिट, अँजिओप्लास्टी यशस्वी, 2 दिवसांनी डिस्चार्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार नारायण राणे यांच्यावर शुक्रवारी सकाळी लीलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्‍यात आल‍‍ी. डॉ. जलील पारकर व डॉ. मॅथ्यू यांनी राणे यांच्या हृदयावर यशस्वी अँ‍जिओप्लास्टी केली.

राणे सकाळी नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. या तपासणीत त्यांंच्या काही चाचण्याही घेेण्यात आल्या. इसीजी काढल्यानंतर त्यांना अॅडमिट करून घेण्यात आले. नंतर त्यांच्या हृदयावर यशस्वी अॅजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असून दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...