आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनपेक्षा अण्णा हजारे अधिक विश्वसनीय!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देशभर रान उठवणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा अधिक ‘विश्वसनीय’ असल्याचे एका सर्वेक्षणात म्हटले आहे. ‘ट्रस्ट रिसर्च सर्व्हे’ यांच्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार विश्वसनीयतेच्या यादीत सचिन तब्बल 234व्या क्रमांकावर आहे. अण्णा हजारे यांचा क्रमांक 106वा आहे. या यादीत बॉलीवूड अभिनेता सलमान खानही असून तो 355व्या क्रमांकावर आहे. भारतातील प्रमुख 15 शहरांत गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आला होते. या सर्वेक्षणाच्या माध्यामातून सुमारे 17 हजार ब्रँड्सबाबत लोकांचे मत आजमावण्यात आले होते. देशातील चर्चित व्यक्तिमत्त्वे आणि अग्रगण्य कंपन्यांबाबत या सर्वेक्षणात माहिती गोळा केली गेली.
हे आहेत टॉप टेन ब्रँड
नोकिया, टाटा, एलजी, सॅमसंग, सोनी, मारुती, बजाज, एलआयसी, एअरटेल आणि रिलायन्स
टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांना यादीत 583वे स्थान देण्यात आले आहे. विजय मल्ल्या यांना 603, तर कार डिझायनर दिलीप छाबरिया यांना 863वा क्रमांक मिळाला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा क्रमांक 894वा आहे. एखादी व्यक्ती एका ब्रँडला किती विश्वासार्ह मानते, या प्रश्नावर हा अहवाल आधारलेला असल्याची माहिती टीआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौळी यांनी दिली. ब्रँडमध्ये सेलिब्रिटी, चर्चित व्यक्तिमत्त्वांचाही समावेश असू शकतो.