आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवालांशी आता आपला संबंध संपला : अण्णा हजारे यांचा खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेता अरविंद केजरीवाल यांच्याशी आता आपला संबंध संपला आहे, असा खुलासा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. येथे एका कार्यक्रमात बोलताना अण्णांनी आता त्यांचा आणि माझा मार्ग वेगळा आहे. ठोस पुरावे मिळाले तर आपण केजरीवाल यांच्याविरोधातही आंदोलन करू, असा इशारा अण्णांनी दिला आहे.

अण्णा म्हणाले, पक्ष स्थापन करतेवेळी ते माझ्याकडे आले होते तेव्हाच मी त्यांना म्हटले होते की, आता तुमचा नि माझा मार्ग वेगवेगळा आहे. दिल्लीत केजरीवाल सरकारवर होत असलेल्या घोटाळ्यांचा आरोप आप आमदारांच्या गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत अण्णांनी मौन पाळले.
अण्णांवरयेतोय सिनेमा : अण्णांच्याहस्ते त्यांच्यावर तयार होत असलेल्या सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आले. आपल्यावर सिनेमा येत असल्याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...