आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare, Medha Patkar Morcha On Mantralaya At Mumbai

साखर कारखाना घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करा- अण्णा, मेधा पाटकरांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील सहकारी तत्त्वावर चालविले जाणारे आजारी साखर कारखान्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून १० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे आणि मेधा पाटकर करीत आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. यात राज्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी, मजूर आणि सामान्य नागरिक सहभागी झाले. त्याआधी अण्णा व मेधा पाटकर यांनी आझाद मैदानावर शेतक-याच्या मोर्चाला संबोधित केले.
राज्यातील विविध भागातील सुमारे 40 सहकारी साखर कारखाने आजारी पाडून कमी रक्कमेत खरेदी केल्याचे मेधा पाटकर यांनी अनेक वेळा म्हटले आहे. मात्र, त्याबाबत राजकीय नेते त्यांनी केलेले आरोप फेटाळून लावणे व त्यात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे सांगत आहेत. मात्र, सरकारकडून अनुदान घेत हे कारखाने अगदी कवडीमोल भावाने विकत घेतल्याचे अण्णा व मेधा पाटकर यांचे म्हणणे आहे. यात सर्वच पक्षाचा समावेश असून, सर्व पक्षीय नेत्यांनी यात हात धुऊन घेतला असल्याचा आरोप करीत आहेत.
सहकार क्षेत्रात 10 हजार कोटींचा घोटाळा झाला असून, या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी, या मागणीसाठी अण्णा आणि मेधा पाटकर हे हजारो शेतक-यांच्या उपस्थितीत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. विशेष म्हणजे सत्ताधारी व विरोधकांनी मिळून हा घोटाळा केला असल्याचे सांगून अण्णांनी सामान्य नागरिकांना पेटून उठण्याचे आवाहन केले. या सहकारी कारखान्याबरोबरच कारखान्याची अतिरिक्त जागा, जमीन मोठ्या प्रमाणात बळकावल्या असून, शेतक-यांचे, सभासद व कामगाराचे कोट्यावधी रूपये बुडवले गेल्याचे माजी आमदार माणिकराव जाधव यांनी म्हटले आहे.