आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा हजारेंनी पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे दिले आश्वासनांचे स्मरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याची आठवण करून दिली आहे. ‘काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार आणि सध्याचे सरकार यांच्या कामकाजात काहीही फरक नाही,’ अशी टिप्पणी अण्णांनी पत्रात केली आहे.

अण्णांनी मोदींना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन तीन पानी पत्र लिहिले आहे.त्यात म्हटले आहे, पंतप्रधानांनी प्रत्येक पत्राला उत्तर द्यावे, अशी अपेक्षा नाही. ते शक्यही नाही. तरीही देशासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या पत्राला उत्तर मिळावे. लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला. पण आजही पैशाशिवाय काम होत नाही. महागाईही कमी झालेली नाही. काळा पैसा परत आणण्याचे आश्वासनही पूर्ण झालेले नाही. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा लागू करण्याबद्दल आपण काहीच बोलत नाही. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर आपल्याला पडला आहे, असे वाटते.
बातम्या आणखी आहेत...