आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थेच्या नावातून ‘भ्रष्टाचार’ शब्द काढा, अण्णा हजारेंना नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना त्यांच्या भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेचे नाव बदलण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी पाठवलेल्या या नोटिशीत अण्णांनी संस्थेच्या नावातून भ्रष्टाचार हा शब्द वगळावा, असे त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम कोणत्याही संस्थेचे नसून ती सरकारची जबाबदारी असते. संस्थांचे काम धार्मिक, समाजसेवेशी संबंधित असते. त्यामुळे संबंधित संस्थांनी नावातून भ्रष्टाचार हा शब्द वगळावा, असे या नोटिशीत स्पष्टपणे म्हटले आहे. त्यासाठी अण्णांना १५ दिवसांची मुदत दिली. इतर काही संस्थांनाही अशीच नोटीस पाठवण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...