मुंबई - अण्णाभाऊ साठे महामंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच घोटाळा केला असून या घोटाळ्याचा फायदा अजितदादांसह राष्ट्रवादीच्या 40 आमदारांना झाल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला.मंडळातर्फे कर्ज वाटप झालेल्या लाभार्थींची यादीही त्यांनी सादर केली.
अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष कदमांनी मंडळाच्या निधीचा वापर मातंग समाजासाठी न करता 2014 च्या निवडणुकीकरिता केला. ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना निधी दिला त्यापैकी 30-40 उमेदवार आमदार झाले आहेत. हा सर्व निधी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच वाटण्यात आला, असा आरोप सोमय्यांनी केला. यावेळी सोमय्यांनी कर्ज वाटपाचे लाभार्थी व महामंडळाकडून ज्या 64 जणांना गाड्या देण्यात आल्या त्यांचीही यादी सादर केली. या घोटाळ्याबाबत शुक्रवारी दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना पुरावे दिल्याचेही सोमय्या म्हणाले. सोमैया यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सरकारी पैशांचा गैरवापर, निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन, मनी लाँडरिंग याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करून निवडणूक आयोगाला कळवावे व तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
नियमबाह्य कर्ज द्या, असे अाम्ही सांगितलेले नाही. शिफारसपत्रे दिली. अंतिम निर्णय संबंधित यंत्रणेचा असताे. अाम्ही काेणाकाेणाची शिफारस केली हे साेमय्यांनी जाहीर करावे. - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी.
मुख्य लाभार्थी आणि मिळालेली रक्कम-
- अजित पवारांच्या उपस्थितीत 11 आणि 30 कोटींचे वाटप.
- पुणे येथे बाबुराव चांदोरे यांच्या उपस्थितीत 19 कोटींचे वाटप.
- पुणे येथे सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत 12 कोटींचे वाटप.
- विद्या चव्हाण : 46 लाख, 12.50 लाख
- नवाब मलिक : 50 लाख
- प्रवीण दरेकर : 10 कोटी
- प्रकाश सुर्वे : 10 लाख
- सुनील तटकरे :10 लाख, 51 लाख
- जितेंद्र आव्हाड : 66 लाख
- संजय सावकारे : 1 कोटी 85 लाख, 69 लाख
- अरुण गुजराथी : 85 लाख
- जयंत पाटील : 81 लाख
- मधुकरराव पिचड : 24 लाख, 27 लाख
- चंद्रशेखर घुले पाटील : 20 कोटी
- शंकर गडाख पाटील : 18 कोटी
- नितीन देशमुख : 5.50 लाख रुपये
- मिलिंद कांबळे : 13 कोटी, 70 लाख रुपये.
पुढे पाहा, किरीट सोमय्यांनी सादर केलेली यादी...