आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम अण्णाशी मतभेद : टीम मुंबईने दिली वेगळी होण्याची धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भ्रष्टाचाराच्या विरोधात गेल्या वर्षीपासून लढत असलेले अण्णा हजारे यांची लढाई आता कमजोर होत चालली आहे. अण्णा हजारे-बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत जंतर-मंतरच्या आंदोलनाच्या स्टेजवरुन अरविंद केजरीवाल एकाएकी उठून गेल्यामुळे मजबूत लोकपाल मागणीच्या व काळा पैसा परत आणण्याच्या धोरणाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. इंडिया अगेंस्ट करप्शनच्या मुंबई युनिटने आरोप केला आहे की, अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन (बीवीजेए) टीम आमच्या प्रयत्नांना कमी लेखण्याचा व आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच या संघटनेने आयएसीच्या सदस्यांत दरार निर्माण केल्याचा आरोप केला आहे.
रविवारी जेव्हा केजरीवाल यांनी आपल्या भाषणात भ्रष्ट नेत्यांची नावे घेतली तेव्हा रामदेव यांनी केजरीवाल यांना टारगेट करीत असे बोलण्याने हे आंदोलन कमजोर होईल, असे सुनावले. त्यानंतर केजरीवाल मंच सोडून निघून गेले होते. त्यानंतर मात्र दोन्ही पक्षांनी सफाई देत टीम अण्णा व रामदेव बाबा यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले होते.
रामदेव बाबांची पंतप्रधानांना हाकः ‘जागो मोहन प्यारे...’
रामदेव-टीम अण्णांत मतभेद; केजरीवाल स्टेज सोडून गेले
टीम अण्‍णामध्‍ये पुन्‍हा वाद, सोशल मिडियावरुन मतभेद