आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चवदार तळे सुशोभीकरणास आवश्यक तेवढा निधी देऊ, मंत्री राजकुमार बडाेलेंची ग्वाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाड येथील अभिवादन सभेपूर्वी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते बार्टीतर्फे सुरू करण्यात अालेल्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात अाले. - Divya Marathi
महाड येथील अभिवादन सभेपूर्वी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते बार्टीतर्फे सुरू करण्यात अालेल्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात अाले.
अलिबाग - ‘महाड येथील चवदार तळे सुशोभीकरण करण्यासाठी, येणाऱ्या अनुयायांच्या आवश्यक साेयी- सुविधांसाठी महाड नगरपरिषदेला आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्यात येईल,’ अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी रविवारी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ वे जयंती वर्ष व चवदार तळे सत्याग्रहचा वर्धापन दिनाचे आैचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने महाड येथे आयाेजित मानव मुक्ती संग्राम अभिवादन सभेत ते बाेलत हाेते. आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मिलिंद माने आदी उपस्थित हाेते.

बडाेले म्हणाले, ‘ डॉ. आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह करुन समतेचा संदेश दिला आहे. म्हणून या भूमीला विशेष महत्व आहे. मागासवर्गीयांच्या सर्वांगिण विकासासाठी आपले शासन कटिबद्ध असून यासाठी अर्थसंकल्पात १७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दलित समाजातून उद्योजक निर्माण होण्यासाठी एमआयडीसीत २० टक्के जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.’ ‘बार्टी’तर्फे सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्राचे उद‌्घाटनही बडाेले यांनी केले. ‘या केंद्रातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण सुविधा मिळेल. त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी मदत हाेईल,’ असा विश्वासही यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...