आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Announcement Of Chief Minister Devendra Fadnavis

उसासाठी आता ठिबक सिंचन सक्तीचे होणार, अधिसूचना लवकरच : मुख्यमंत्र्यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वातावरण बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी टप्प्याटप्प्याने उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाबाबतची अधिसूचना जारी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नाबार्डच्या क्रेडिट सेमिनारमध्ये बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, उपलब्ध पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी उसासारख्या पिकाला ठिबक सिंचन बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अधिसूचित क्षेत्र आणि कारखान्यांच्या क्षेत्रात ठिबक कार्यक्रम लागू होईल.
करण्यात येईल जमिनीतला ओलावा टिकणे आवश्यक आहे. म्हणूनच सर्वाधिक पाणी वापर होणाऱ्या ऊसासारख्या पिकांना ठिबक सिंचनाची सक्ती करण्याची गरज गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ऊसासारख्या पिकाला ठिबक सिंचन बंधनकाक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला अाहे. त्यासाठी लवकरच एक कालबध्द ठिबक कार्यक्रमाचा समावेश असलेली अधिसूचना जारी करण्यात येईल. यामुळे साखर उद्योगाचे अर्थकारण बदलेल. अधिसूचित क्षेत्र अाणि कारखान्यांच्या क्षेत्रात ठिबक कार्यक्रम लागू करण्यात येईल असे सांगितले. हा निर्णय म्हणजे शुगर लॅबीला झटका मानला जाताे.
शाश्वत शेतीवर भर-
सूक्ष्म स्तरावर शेतीचे नियोजन आवश्यक आहे, असे सांगत फडणवीस यांनी काही सूचना केल्या.
नाबार्डने पीक कर्ज वाटपाऐवजी शाश्वत शेतीसाठी गुंतवणूक कर्जपुरवठा वाढवावा.
शाश्वत कृषी विकासासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक कर्ज वाढवा. त्यातून पायाभूत सुविधा उभारा.
याच कर्जातून शेतकरी परतफेडीसाठी सक्षम कसा होईल याचा बँकांनी विचार करावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.