आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Another 21 Former Mla & Mla Joins In Bjp State President Raosaheb Danave Speak At Public Rally

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

21 आजी- माजी आमदार लवकरच भाजपात- प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ नागपूर- मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून 5 माजी आमदारांना पक्षात प्रवेश दिला आहे. आता येणा-या काही दिवसात भाजपमध्ये राज्यातील तब्बल 21 आजी माजी आमदार भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. भाजपमध्ये येणा-या या 21 आजी-माजी आमदारांची यादी तयार असून, पक्षश्रेष्ठींची संमती घेवून त्यांना लवकरच प्रवेश देणार असल्याचेही दानवेंनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष दानवे राज्यातील विविध जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. प्रदेश भाजप सध्या राज्यात सदस्य नोंदणी अभियान राबवत आहे. त्यानिमित्ताने दानवे हे बुधवारी उस्मानाबाद येथे आले होते. त्यावेळी ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आज सकाळी नागपूरातही पत्रकारांनी छेडल्यानंतर या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दानवे म्हणाले की, सध्या भाजपला सर्वत्र पसंती मिळत आहे. त्यामुळे पक्षाला अच्छे दिन आले आहेत. पूर्वी भाजपचा पदाधिकारी, अथवा कार्यकर्ता म्हटले की, लोक रिकामटेकडा आहे असे म्हणत. आता, पक्षात येणा-यांचा ओढा वाढलाय. मी अध्यक्ष झाल्यापासून पाच आजी- माजी आमदार पक्षात आले आहेत. आणखीन 21 जण भाजपमधून येऊ इच्छित आहेत ते लवकरच पक्षात प्रवेश करतील.

भाजप जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उभारणार आहे. सध्या जगात चीनमधील कम्युनिष्ट पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षाचे 7 कोटी सदस्य आहेत. परंतु, भाजपचे 10 कोटी सदस्य नोंदविण्याचे उ्दिष्ट असून सध्या 43 लाख सदस्यांची नोंदणी झालेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत:चे 100 सदस्य नोंदवावेत. त्यानुसार आमदारांना लाख सदस्य नोंदविण्याचे, पराभूत उमेदवारांना 10 हजार, खासदारांना 25 हजार पक्षाशी संलग्न इतर संघटनांना कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे सांगितले. या सदस्य नोंदणी अभियानाचा तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन शुभारंभ केल्याचे सांगून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही यासाठी सक्रीय होऊन उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन केले.
भाजप-शिवसेनेत व मुख्यमंत्री-खडसेत सर्व काही ठीक-
शिवसेना व भाजपमध्ये सर्व काही ठीक असल्याचे सांगून दानवे म्हणाले, शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी एखाद्या मुद्यांवर, धोरणावर नाराजी व्यक्त केली म्हणजे ते सरकारवर नाराज आहेत असा अर्थ होत नाही. दोन्ही पक्षांत चांगला समन्वय राहावा यासाठी युती सरकार लवकरच दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची समन्वय समिती स्थापन करणार आहे असेही दानवेंनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यातही सर्वकाही ठीक आहे. दोघांत कोणतेही मतभेद नाही. खुद्द खडसेंनीच हे सांगितले आहे त्यामुळे त्यावर बिनकामी चर्चा नको असेही दानवेंनी सांगितले.
दानवेंनी नागपूरात संघाच्या मुख्यालयाला दिली भेट-
दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी आज सकाळी (गुरुवारी) नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात हजेरी लावली. राज्यात भाजप सदस्य नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून, भाजपचे महाराष्ट्रात एक कोटी सदस्य बनविणार असल्याचे दानवेंनी सांगितले. याचबरोबर फडणवीस सरकारला 100 दिवस पूर्ण झाले असून, सरकारने केलेल्या कामाचा आढावा जनतेपुढे मांडणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
पुढे वाचा, भाजपच्या रडावर शिवसेनाच, शिवसेनेच्या कारभाराबरोबरच नेतृत्वावरही सोडले टीकास्त्र