आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि त्यांच्या घरातील लग्नकार्यामुळे 100 जणांचे प्राण वाचले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- त्यांच्या घरात दुस-यादिवशी लग्नकार्य होते. त्यामुळे त्या घरातील लोक व आलेली चार पाहुणे मंडळी रात्री उशिरापर्यंत लग्नाची तयारी व आवराआवरी करीत होते. रात्रीचा एक वाजून गेला होता. सकाळी पुन्हा लवकर उठायचे असल्याने ज्येष्ठांनी झोपण्याच्या सूचना केल्या. झोपायची तयारी सुरु असतानाच घराचा काही अचानक कोसळला. बघताहेत तर काय, इमारतीचा पिलरही थोडा वाकल्यासारखा दिसला. आता घराचा दुसरा कोपराही हळू-हळू कोसळू लागला. घरातील लोक अचानक हे काय होतेय म्हणून गांगरून गेले.
घरात एकच गोंधळ सुरु झाला. पण इमारतीतील इतर 20-25 कुटुंब गाड झोपेत होते. मग लग्नकार्य असलेल्या तेलंगे व वस्य कुटुंबियांनी तत्काळ सर्वांच्या दारावर रात्री कधी बेल मारत तर कधी दारावर थापा मारत जागे केले व इमारत कोसळण्याचा धोका असल्याचे सांगत तत्काळ बाहेर या व खाली जाऊन मोकळ्या जागेत जा, असे घरातील तरूणांनी सांगितले. दहा मिनिटातच इमारतीतील 25 कुटुंब सुखरूप बाहेर पडली आणि काही मिनिटांतच ती चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ...आणि काळ आला होता पण वेळ आली नव्हती याच उक्तीचा प्रत्यय आला. ही घटना आहे ठाण्यातील कळवा भागातील.
याबाबतची माहिती अशी की, रविवारी मध्यरात्री एक-दीड वाजण्याच्या सुमारास कळव्यातील भुसारआळीतील अन्नपूर्णा अपार्टमेंट सुमारास चार मजली पत्त्याप्रमाणे कोसळली. यात किमान 100 लोकांचे प्राण वाचले. इमारतीत राहणा-या दोन कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टाळण्यात यश मिळवले.
रहिवाशांनी एकमेकांच्या मदतीने इमारत रिकामी केली. मात्र जीवितहानी झाली नसली तरी लाखो, कोट्यावधी रूपयांचे घरातील सामान इमारतीच्या मलब्यात अडकले आहे. मात्र, सर्वांनी एकच सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण यात कोणतेही जीवितहानी झाली नाही ही समाधानाची बाब असल्याचे इमारतीतील रहिवाशांचे म्हणणे आहे. याचबरोबर तेलंगे व वस्य कुटुंबांचे इमारतीतील लोकांनी आभार मानले. मात्र, या दोन कुटुंबाचे आपल्या घरात ज्या दिवशी शुभकार्य होते त्यादिवशीच डोक्यावरील घराचे छप्पर नाहीसे झाले. त्यामुळे हे कुटुंब थोडेसे नाराज असले तरी जे काही घडले ते चांगलेच (कोणतेही जीवितहानी झाली नाही) झाले असे म्हणत देवाचे आभार मानत आहेत.