मुंबई- पाकिस्तान सरकारने बुधवारी पेशावर कोर्टात मान्य केले की, तीन वर्षापासून बेपत्ता असलेला मुंबईतील एक इंजिनिअर हामिद अन्सारी लष्कराच्या ताब्यात आहे. त्याच्यावर लष्कराच्या कोर्टात खटला सुरु आहे. हामिद तीन वर्षापूर्वी एका पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडून तिला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेला होता.
सोशल मीडियातून झाले होते प्रेम-
- नोव्हेंबर 2012 मध्ये 28 वर्षाचा हामिद मुंबईतून अफगाणिस्तानला नोकरीसाठी गेला.
- सोशल मीडियाच्या माध्यमातून हामिद पाकिस्तानच्या एका मुलीच्या प्रेमात पडला.
- तिला भेटण्यासाठी तो अफगाणिस्तानची सीमा पार करून कोहाट येथे गेला. तेथे एका हॉटेलमध्ये राहिला.
- तेथे गेल्यावर त्याला स्थानिक पोलिस व गुप्तचर संघटनांनी 12 नोव्हेंबर 2012 रोजी अटक केली.
- तेव्हापासून हामिद अन्सारीचा कोणाशीही संपर्क नाही.
पुढे वाचा, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण...