आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Another Hit And Run Case In Mumbai As Mercedez Car Hits Five Persons

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत भरधाव मर्सिडीझने पाच जणांना उडविले, दोघांची प्रकृती गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत आणखी एक हिट अॅण्‍ड रन प्रकरण घडले आहे. काल मध्यरात्रीनंतर एक वाजताच्या सुमारास भरधाव मर्सिडीझने पाच जणांना उडविले. अंधेरी पश्चिमेला असणाऱ्या चार बंगला परिसरात हा अपघात झाला. पाचपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावली करण्याच्या उद्देशाने पाच जण घराबाहेर पडले होते. पहाटे एकच्या सुमारास भरधाव मर्सिडीझ गाडीने त्‍यांना उडवले. अपघातानंतर चालक गाडीसह फरार झाला आहे. मात्र घटनास्थळी गाडीच्या नंबरप्लेट आणि लोगोचा एक भाग तुटून पडला आहे. याच वस्तूंच्‍या आधारे पोलिस गाडीचा शोध घेत आहेत.

जखमींना कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांमध्ये एक पटकथा लेखक आणि एका वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा समावेश आहे. तर इतर तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही.