आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Another Hit & RUn Case In Mumbai, 5 People Injured, 3 Serious

मुंबईत पुन्हा हिट अॅंड रन, मर्सिडिज बेंझने 5 जणांना चिरडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील मस्जिद बंदरच्या क्रॉफर्ड मार्केटजवळील महम्मद अली रोडवर एका भरधाव मर्सिडिज बेंझ कारने फूटपाथवरील 5 जणांना चिरडल्याची घटना आज पहाटे घडली. या घटनेतील 5 जखमींपैकी दोघांची प्रकृती फारच नाजूक असल्याचे कळते. जखमींवर जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. भरधाव कारने पाच जणांना चिरडणारा बीएमसीचा कंत्राटदार आमिन युसूफ खान याला पायधुनी पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सव्वाबारा वाजता आमिन खान हा आपली मर्सिडीज कारने जे जे हॉस्पिटलकडून सीएसटी स्टेशनच्या दिशेने चालला होता. आमिन खान वेगाने कार चालवत होता. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटत चालले होते. सर्वप्रथम त्याने दोन कार गाड्यांना धडक दिली. त्यानंतर काही अंतरावरच क्रॉफर्ड मार्केट सर्कलजवळ पोहोचताच त्याची गाडी फुटपाथवर चढली. आमिनचे गाडीवरील संपूर्ण नियंत्रण सुटल्याने फुटपाथवरील पाच जणांना त्याच्या गाडीने चिरडले. यात चार महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे.
घटना घडताच चालक आमिन खान फरार झाला. मात्र, आज सकाळी त्याला पोलिसांनी अटक केली. आमिन मुंबई महानगरपालिकेचा कंत्राटदार असल्याचे पुढे आले आहे. या घटनेनंतर मुंबईत फूटपाथवर झोपणा-या लोकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, या अपघातातील छायाचित्रे...