आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील आणखी एक युवक इसिसच्या वाटेवर? शोध घेण्यासाठी एटीएस सक्रीय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
मुंबई - जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी आणखी एक तरुण गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माहिम येथील 20 वर्षीय युवक सय्यद अशरफ इरफान गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी एटीएस सुद्धा सक्रीय झाले आहे. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की माहिम येथे राहणारा अशरफ 27 फेब्रुवारी रोजी घराबाहेर पडला. त्यानंतर कधीच परतला नाही. आपला मुलगा इसिसमध्ये तर सहभागी झाला नाही ना? या भितीने कुटुंबियांची झोप उडाली आहे. 
 
इंटरनेट, खाण्या-पिण्याचा खर्च कुणाकडून?
अशरफच्या भावाने सांगितल्याप्रमाणे, सय्यद अशरफ दररोज तासंतास इंटरनेटवर वेळ घालवायचा. त्याच्या इंटरनेटचा आणि खाण्या-पिण्याचा खर्च कोण देत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 
 
शोध घेण्यासाठी मुंबई एटीएस सतर्क
अशरफच्या गायब होण्याचे वृत्त मिळाल्यानंतर मुंबई एटीस सुद्धा त्याचा शोध घेण्यासाठी सक्रीय झाले. अशरफ ज्या इंटररनेट कॅफेवर जात होता, तेथील व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची चौकशी घेण्यात आली. यासोबतच, एटीसने इंटरनेट कॅफेतील हार्ड डिस्क सुद्धा ताब्यात घेतली. मात्र, या सर्व तपासात हाती काय लागले, यावर एटीएसने अद्याप माहिती जाहीर केली नाही.
बातम्या आणखी आहेत...