आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लकी इमारत दुर्घटना; आणखी सात अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 74 जणांचे बळी घेणा-या लकी या अनधिकृत इमारतीशी संबंध असल्याप्रकरणी ठाणे महापालिकेतील दोन कर्मचा-यांसह पाच जणांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 21 झाली आहे. निलंबित लिपिक सुभाष वाघमारे आणि रामदास बुरूड अशी आरोपींची नावे आहेत. तर इतर पाच जण हे लकी इमारतीच्या बिल्डरचे सहकारी आहेत.

बिल्डर महापालिका अधिका-यांना वाघमारे आणि बुरूड यांच्यामार्फत पैसे पुरवत होता, त्यामुळे या दोघांनाही अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.