आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Another Submarine Mishap: 5 Sailors Hospitalised After Smoke On INS Sindhuratna

मुंबईजवळील समुद्रात भारतीय नौसेनेच्या पाणबुडीला आग, 5 नौसैनिक जखमी, 2 बेपत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई किनारपट्टीपासून 50 किलोमीटर अंतरावर समुद्रात भारतीय नौसेनेच्या पाणबुडीला आग लागल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. या पाणबुडीवर 7 नौसैनिक होते. त्यातील 2 जण बेपत्ता आहेत.
या आगीत 5 जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही आग किरकोळ असून ती आटोक्यात आणली जात आहे. आगीमुळे पाणबुडीवर मोठ्या प्रमाणात धूर तयार झाल्याने नौसैनिक बेशुद्ध झाले होते. मात्र त्यांना एअरलिफ्ट करून मुंबईतील नौदलाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत नौदलाकडून लवकरच अधिक माहिती दिली जाईल, असे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे.