आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Another Woman Claims She Too Was Raped By Gangrape Accused

शक्तीमिलमधील आणखी एक बलात्कार उघड, अटकेतील गँगरेप आरोपींचेच कृत्य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महालक्ष्मी येथील शक्ती मिल परिसरात आणखी एक बलात्काराची घटना उघड झाली आहे. छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींनीच हे कांड केले असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. जुलै महिन्यात शक्ती मिल कंपाउंडमध्येच 19 वर्षीय तरुणीवर अटकेत असलेल्या आरोपींनी दुष्कर्म केले होते, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

आईच्या भीतीने त्यावेळी पोलिसात तक्रार दाखल केली नाही. मात्र, 22 ऑगस्ट रोजी 23 वर्षीय छायाचित्रकार तरुणीवर त्याच ठिकाणी बलात्कार झाल्याची बातमी वाचली. अटकेतील आरोपीही तेच असल्याचे जाणवल्यामुळे पीडित तरुणीने तक्रार केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जुलै मध्ये बलात्कार झाल्यानंतर शहर सोडून गेलेल्या पीडित तरुणीने भांडूप पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी ना.म. जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार वर्ग केली आहे.