आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जादूटोणाविरोधी कायदा आता तरी मंजूर करा - डॉ. दाभोलकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 14 वर्षांपासून रखडलेला जादूटोणाविरोधी कायदा यंदाच्या अधिवेशनात तरी संमत करावा, असे निवेदन अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. राष्‍ट्रवादी पक्ष व उपमुख्यमंत्र्यांनी या कायद्याला ठोस पाठबळ दिले आहे. मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळावे यासाठी राज्यभरातून 14 हजार निवेदने मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत. या मोहिमेची सुरुवात 19 फेब्रुवारी रोजी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हा कायदा एका वर्षात करण्याचे लेखी आश्वासन 1999 मध्ये सरकारने दिले होते. त्याला 14 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर 15 ऑ गस्ट 2003 रोजी जादूटोणाविरोधी कायदा केलेले पहिले राज्य म्हणून महाराष्‍ट्र सरकारने जाहिरात केली होती. मात्र, वारकरी संघटनांनी काही आक्षेप घेतल्यामुळे हा कायदा रखडला होता. त्यात दुरुस्ती करून काही तरतुदी वगळण्यात आल्या आहेत.