आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anti Corruption Bureau News In Marathi, Facebook, Social, Divya Marathi

भ्रष्ट अधिका-यांची आता फेसबुकमार्फत ‘पोलखोल’, भ्रष्‍टाचार प्रतिबंधक विभागाची मोह‍िम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग (एसीबी) लाचखोरी रोखण्यासाठी फेसबुकवर विशेष पेज सुरू करणार आहे. लाच घेताना पकडलेल्या अधिका-यांची नावे या सोशल नेटवर्किंग साइटवर टाकण्यात येतील. भ्रष्टांची जाहीर बदनामी होईल आणि भ्रष्टाचाराला चाप बसेल, असे मत अधिका-यांनी व्यक्त केले.

एसीबीने याआधीही भ्रष्ट अधिका-यांची छायाचित्रे संकेतस्थळावर टाकली आहेत, पण आता फेसबुकद्वारे जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. अटक झाल्यानंतर अधिकारी निलंबित होतो आणि पुन्हा रुजू होतो आणि पुन्हा लाच घेतो. या घटनांना यामुळे आळा बसेल, असे एसीबीला वाटते.

रकमेचा तपशीलही मिळणार : एसीबी अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही युवकांना ही साइट पाहण्याचे आवाहन करणार आहोत. भ्रष्ट अधिका-यांची छायाचित्रे त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचावीत आणि आपले पालक काय करत आहेत हे त्यांना कळावे हा त्यामागचा हेतू आहे. आरोपी अधिकारी किती रकमेची लाच घेताना पकडला गेला आणि तपासणीदरम्यान त्याच्या घरातून किती दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली, याची माहितीही छायाचित्रांसोबतच वेबसाइटवर देण्यात येईल.