आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anti Magic Bill Make Loss To Congress, Shiv Sena Leader Divakar Rawate's Remark

जादूटोणा विधेयकामुळे काँग्रेसचाच तोटा होईल,शिवसेना नेते दिवाकर रावते यांचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंनिस संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर भावनिक वातावरण तयार झाल्याने राज्य सरकार हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालणारे विधेयक आणत आहे. जर हे विधेयक आले तर आघाडीच्या 50 ते 60 आमदारांना मतदार घरी पाठवतील, असे मत शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते दिवाकर रावते यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
जादूटोणा विधेयक या हिवाळी अधिवेशनात आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता आणि पहिल्याच दिवशी व्हिपही काढले होते. त्यानुसार गुरुवारी विधानसभेत हे विधेयक सुधारणांनिशी मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक विधान परिषदेत मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे.
विधान परिषदेत विधेयक मंजूर करणार का असा प्रश्न दिवाकर रावते यांना विचारला असता, ते म्हणाले, त्यांचे संख्याबळ जास्त असल्याने विधेयक मंजूर होईल, परंतु आम्ही आमचा विरोध तीव्रपणे मांडणार आहोत. त्यामुळे सहजासहजी विधेयक आम्ही मंजूर होऊ देणार नाही. राज्यातील दहा कोटी जनतेच्या जीवनाशी निगडित हे विधेयक असल्याने परिपूर्ण असे विधेयक सरकारने सादर केले पाहिजे असे आमचे म्हणणे आहे.
दाभोलकरांबद्दल आम्हाला तीव्र आदर आहे. मी स्वत: त्यांच्याशी अनेक वेळा बोललो आहे. परंतु त्यांना हिंदूंच्या प्रत्येक प्रथेवर आक्षेप होता. पिंडदान हा आमच्या श्रद्धेचा भाग आहे. परंतु आमच्या रोजच्या जीवनावर जर एखादा कायदा बाधक ठरत असेल तर त्याचा विरोध करायलाच हवा असेही ते म्हणाले.