आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anti Suicide Fan Made, Madhya Pradesh Heart Expert Research

‘आत्महत्या रोधक’ फॅनची निर्मिती, मध्य प्रदेशच्या हृदयरोगतज्ज्ञाचा शोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जर्मन इंजिनिअर फिलिप डेव्ही यांनी 1882 मध्ये सीलिंग फॅनची निर्मिती केली तेव्हा माणसाला गारवा देणा-या या शोधाचा वापर आत्महत्येसाठी होईल, अशी कल्पनाही त्यांना नसेल. सीलिंग फॅन मृत्यूला कवटाळण्याचा सोपा मार्ग झाला असून, यावर मध्य प्रदेशातील हृदयरोगतज्ज्ञ आर. एस. शर्मा यांनी ‘सुसाइडपू्रफ’ पंख्याचा तोडगा काढला आहे.


हे केले, ‘कॉमन सेन्स वापरून!’
जबलपूरच्या मेडिकल कॉलेजातील प्राध्यापक शर्मा म्हणाले, घरातील पंखा आत्महत्येचे उपकरण ठरत असल्याची जाणीव सतत बोचत होती. त्यावर तोडगा काढण्याचा निर्धार करत वेल्डर आणि मेकॅनिक्स यांच्याकडे खेटे घातले. अखेर सीलिंग फॅनची अतिरिक्त वजन पेलण्याचीच शक्ती कमी केली तर तो सुसाइडप्रूफ होऊ शकतो हे लक्षात आले.


घराघरांत पोहोचावे मशीन :
अभिनेत्री जिया खानने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूला कवटाळण्यासाठी सोप्या मार्गाचा अवलंब करणा-यांना शर्मा यांनी तयार केलेला पंखा नवे जीवन देणारा ठरेल. त्यासाठी घराघरात हे मशीन पोहोचावे, असे आयआयटीच्या टीमचे म्हणणे आहे.


33% गळफास फॅनलाच
नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार 33.2 % लोक गळफास घेऊन आत्महत्या करतात. हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आपल्या मशीनमुळे आत्महत्या करणा-यांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, अशी आशा शर्मा यांना आहे.


तंत्र असे
फॅनची मोटार आणि ब्लेड्स यांना जोडून ठेवणारी एक पोकळ लोखंडी नळी पंख्यात फिट केलेली असते. शर्मा यांनी तयार केलेले मशीन पंख्यात बसवले तर 25 किलोपेक्षा जास्त भार सहन न होऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती पुन्हा पायावर उभी राहते.