आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दहशतवादविराेधी स्कूल’ नागपुरात स्थापन करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाेलिस अधिकारी व कर्मचारी यांना नक्षलविरोधी व दहशतवादविरोधी लढ्यामध्ये समर्थपणे भूमिका बजावता यावी या उद्देशाने सुराबर्डी (नागपूर) येथील अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्रात दहशतवादविराेधी विद्यालय (काउंटर इन्सर्जन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल) स्थापन करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात अाली. जंगल टॅक्टिस, फील्ड क्रॉम्प्ट, जंगल फील्ड, मॅप रीडिंग, शस्त्र हाताळणी, दहशतवाद व नक्षलवादविरोधी मोहिमा आदी अाव्हानांना ताेंड देण्यासाठी राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना या संस्थेत प्रशिक्षित करण्यात येणार अाहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार पूर्णपणे राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेले हे विद्यालय विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान, नागपूर) यांच्या अधिपत्याखाली कार्यरत हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...