आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एंटीलिया\'च्या प्‍लास्टिक शीट्स खऱ्या की खोट्या, मुकेश अंबानी यांनी वृत्त फेटाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत पाऊस पडायला सुरुवात झाली की तो कोणाचेही ऐकत नाही, असे म्हणतात. कारण यापूर्वी पाऊस काय करू शकतो, हे मुंबईकरांना चांगलेच ठावूक झाले आहे. आता हेच बघा ना, रिलायन्स इंडस्ट्रीजच मालक मुकेश अंबानी यांनाही पावसापासून आपल्या घराचे संरक्षण कसे करायचे असा प्रश्न पडला असल्याचे दिसतेय. मुकेश अंबानी यांनी आपले सुप्रसिद्ध घर 'एंटीलिया'चे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून चक्क निळ्या रंगाच्या प्लास्टिक शीट्‍सने छाकले आहे. मायक्रो ब्लॉगिंक साइट 'टि्वटर'वर एका यूजरने शेअर केली आहेत. दरम्यान, इमारतीच्या बांधकामाच्या वेळी या निळ्या रंगाच्या प्लास्टिक शीट्स लावल्या होत्या. ही जुनी छायाचित्रे आहेत, असे मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केले आहे.

'एंटीलिया'ची छायाचित्रे मायक्रो ब्लॉगिंक साइट 'टि्वटर'वर एका यूजरने शेअर केली आहेत. एंटीलियाचे छायाचित्र पाहाण्यासाठी नेटिजन्सच्या अक्षरश: 'टि्‍वटर'वर उड्या पडल्या आहेत. छायाचित्रांवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही उमटत आहेत. 'हफिंगटन पोस्‍ट'ने एंटीलियाची किंमत एक ब‍िलियन डॉलर अर्थात जवळपास सहा हजार कोटी रुपये सांगितली आहे.

जगातील सगळ्यात महागडे घर ठरले 'एंटीलिया'
27 मजली उंच असलेले 'एंटलिया' हे जगातील सगळात महागडे घर आहे. विशेष म्हणजे बिझनेस मॅगझिन 'फोर्ब्‍स'ने ‘जगातील अब्जाधिशांच्या महागड्या घरांच्या यादीत मुकेश अंबानी यांच्या 'एंटीलिया'ला अव्वल स्थान दिले होते.
आलिशान घराचा सहावा मजला हा फक्त पार्किंग आणि गॅरेज देण्यात आला आहे. तसेच एक बॉलरूम आहे. त्याचे छत महागड्या रत्नांनी सजवले आहे. या घरात एक सिनेमागृह आहे. बार तसेच तीन हेलिपॅड आहेत. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधाही येथे उपस्थित आहे.

(फोटो- मुकेश अंबानी यांचे आलिशान घर 'एंटीलिया'ला शुक्रवारी निळ्या प्‍लास्टिक शीट्सने छाकलेले घर)

पुढील स्‍लाइड्स पाहा, 'एंटीलिया'मधील अत्याधुनिक सुविधा...