आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Any Time Nationalist Congress Ready For Elections

राज्यात सरकार पडल्यास राष्ट्रवादी निवडणुकीस कधीही तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपच्या सततच्या दबावापुढे न झुकता शिवसेनेने सत्तेबाहेर पडून दाखवण्याची हिंमत दाखवावी. दबावाचे केवळ नाटक करू नये. शिवसेनेने सरकार पाडले तर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकांसाठी कधीही तयार असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नबाव मलिक यांनी दिली.

भाजप व शिवसेना एकत्र सत्तेत दिसली तरी त्यांचे एकमेकांशी पटत नाही, हे वारंवार दिसले आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांच्या आत्महत्यांवरून भाजपला आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे. आता दिल्लीतील निवडणुकांच्या निकालानंतर तातडीने पत्रकार परिषद घेऊन उद्धव यांनी मोदी व भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मात्र असे दबावाचे नाटक न करता, शिवसेनेने भाजपला धडा शिकवायला हवा. सत्तेपेक्षा स्वाभिमान मोठा असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून द्यायला हवे, असे मलिक म्हणाले.