आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Api Marhan Issue Thakur & Kadam In Police Custody For Oneday

एपीआयला विधीमंडळात मारहाण प्रकरण : क्षितीज ठाकूर, राम कदमांना पोलिस कोठडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधिमंडळात पीएसआयला मारहाण केल्याप्रकरणी आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम गुरुवारी पोलिसांसमोर हजर झाले. अटक करून त्यांना कोर्टात सादर केल्यावर एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दोघांनाही क्रॉफर्ड मार्केट येथील कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे.

पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणार्‍या इतर 15 जणांची ओळख पटवण्यासाठी आमदारांना कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली. सूर्यवंशी यांना बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आल्याचेही कोर्टात सांगण्यात आले. आमदारांवर कलम 353 व 332 (सरकारी कामांत अडथळे) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सीसीटीव्हीमध्ये जैस्वाल, रावल, साळवी दिसतच नाहीत : भाजप- दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आमदार प्रदीप जैस्वाल, जयकुमार रावल आणि राजन साळवी दिसत नसल्याचा दावा भाजपने गुरुवारी केला. त्यांचे निलंबन कोणत्या आधारे केले, असा प्रश्नही विरोधी पक्षाने उपस्थित केला.