आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Api Marhan Issue Thakur, Kadam & Other 3 Mla Suspended

आमदार क्षितीज ठाकूर, राम कदम पोलिसांना शरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधान भवनाच्या लॉबीत पोलिस अधिकार्‍याला मारहाण करणारे निलंबित आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम पोलिसांना शरण आले आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. थोडयाच वेळातच त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याबद्दल कदम व ठाकूर यांच्यासह अन्य तीन आमदारांविरोधात मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय त्यांना अटक करता येत नव्हती. मात्र, या आमदारांना निलंबित करण्‍यात आल्‍याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अटक टाळण्यासाठी दोन्ही आमदारांनी शरण जाण्याचा मार्ग अवलंबला असल्याचे सांगितले जाते.