आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Api Marhan Issue Thakur, Kadam & Other 3 Mla Suspended

आमदार क्षितिज ठाकूर, राम कदम यांची पोलिस कोठडीत रवानगी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधिमंडळाच्या लॉबीत सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबित भारिपचे आमदार आणि महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांना किला कोर्टाने 22 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गुरुवारी सकाळी दोघेही पोलिसांना शरण आले होते.

वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याबद्दल कदम व ठाकूर यांच्यासह अन्य तीन आमदारांविरोधात मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय त्यांना अटक करता येत नव्हती. मात्र, या आमदारांना निलंबित करण्‍यात आल्‍याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अटक टाळण्यासाठी दोन्ही आमदारांनी शरण जाण्याचा मार्ग अवलंबला.

क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांनी आज किला कोर्टात हजर केले असता. त्यांना कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

आज राम कदम, क्षितिज ठाकूर यांना यांना मुंबई क्राईम बॅंच पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या दोन्ही आमदारांची जी टी रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.