आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • API Sachin Suryavanshi Case MLA Ram Kadam, Kshitij Thakur, Pradip Jaiswal

एपीआय मारहाण प्रकरण : कदम, क्षितीज ठाकूरसह पाच आमदारांचे निलंबन मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या क्षितिज ठाकूर व राम कदम यांच्यासह पाच आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने पाचही आमदारांचे निलंबन मागे घ्यावे अशी शिफारस एप्रिलमध्ये केली होती. त्यानुसारच आमदार प्रदीप जैस्वाल, राजन साळवी, राम कदम, क्षितीज ठाकूर, जयकुमार रावल यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून या आमदारांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांच्यासह अनेकांनी केली होती.

काय घडले होते ?
18 मार्च रोजी वांद्रे-वरळी सागरी सेतूवर गाडी वेगाने चालवण्यावरून सूर्यवंशी व बहुजन विकास आघाडीचे आमदार ठाकूर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. या घटनेची माहिती घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी त्यांना दुस- या दिवशी विधान भवनात पाचारण केले असता ठाकूर व कदम यांनी त्यांना मारहाण केली. राजन साळवी, प्रदीप जैस्वाल व जयकुमार रावल यांच्यावरही कृत्यात सामील असल्याचा आरोप होता. त्याबद्दलही पाचही जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.