आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • API Sachin Suryawanshi Batten Case MLA Kadam And Thakur

एपीआय मारहाण; कदम व ठाकूरविरोधात आरोपपत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधिमंडळाच्या आवारात सहायक पोलिस निरीक्षकाच्या मारहाणप्रकरणी गुन्हे शाखेने दोन आमदारांविरुद्ध शनिवारी आरोपपत्र दाखल केले.
मनसे आमदार राम कदम आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी वरळी वाहतूक विभागातील सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना 19 मार्च रोजी मारहाण केल्याचा आरोप आहे. बांद्रा-वरळी सागरी मार्गावर अतिवेगात वाहन चालवल्याबद्दल सूर्यवंशी यांनी ठाकूर यांना दंड भरण्यास सांगितले होते. त्याच्या दुसºया दिवशी ही घटना घडली.
घटनेवेळी उपस्थित 27 साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये विधिमंडळातील काही सुरक्षा कर्मचाºयांचाही समावेश आहे. एका अधिका-याने दिलेल्या जबाबात, 15-20 व्यक्तींनी सूर्यवंशी यांच्यावर हल्ला चढवला. यादरम्यान आमदार कदम यांनी मारहाण सुरू ठेवली व जिवे मारण्याची धमकी दिली. आमदार ठाकूर यांनीही मारहाण केल्याचा उल्लेख आहे.
आरोपपत्रामध्ये 13 अज्ञात जणांविरोधातही आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात ठाकूर व कदमव्यतिरिक्त 14 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. दोन आमदारांना 21 मार्च रोजी अटक झाली, त्यानंतर 25 मार्च रोजी दोघांना जामीन मंजूर करण्यात आला. घटनेनंतर राम कदम व क्षितिज ठाकूर यांना विधानसभेतून निलंबित केले होते.