आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • App Taxi Ban In State, Booking Stop Order By Transport Commissioner

अ‍ॅप टॅक्सीवर राज्यात बंदी, बुकिंग बंद करण्याचे परिवहन आयुक्तांचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात वेबआधारित टॅक्सी सेवेवर बंदी घालण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. दिल्लीत उबर टॅक्सीचालकाने २७ वर्षीय युवतीवर केलेल्या बलात्काराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

परिवहन सचिव एस. के. शर्मा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, वेबआधारित टॅक्सी सेवेचे बुकिंग थांबवण्याचे आदेश परिवहन आयुक्तांना देण्यात आले आहेत. ते तत्काळ आवश्यक कारवाई करतील. आता या आदेशाची अंमलबजावणी करणे एवढाच मुद्दा उरला आहे. वेब आधारित टॅक्सी सेवेवर बंदी घालावी, असा सल्ला केंद्र सरकारने दिला होता. त्यावर विचार केल्यानंतर राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

उबरच्या जीएमवर मुंबईत हल्ला
दिल्लीतील बलात्काराच्या घटनेमुळे वादाच्या भोव-यात सापडलेल्या उबर कंपनीचे मुंबईतील सरव्यवस्थापक शैलेश सावलानी यांच्यावर स्वाभिमान संघटनेच्या पदाधिका-याने बुधवारी हल्ला केला. सावलानी हे बांद्रा भागात परिवहन आयुक्तांशी चर्चा करून बाहेर पडताना ही घटना घडली.