आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनेरिक औषध शोधण्यास आता मदत करणार अॅप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतातील औषध विक्रीचा बाजार प्रचंड मोठा असून विदेशी कंपन्या आपली औषधे महागड्या किमतीने विकतात. यातून त्यांना उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी पटींनी जास्त कोट्यवधींचा नफा होतो. ग्राहकांना मोठ्या कंपन्यांच्या औषधात असलेल्या कंटेंटची स्वस्त जेनेरिक औषधे देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने सुरू केला आहे. अनेक राज्यांतील राज्य सरकारेही जेनेरिक औषधांवर भर देत आहेत. मात्र, जेनेरिक औषधांची नावे ग्राहकांना माहीत नसतात. हीच बाब लक्षात घेऊन प्रबोधन संस्थेने पीजीएमएस नावाचे अॅप तयार केले असून यात सर्व प्रमुख आजारांवरील जेनेरिक औषधांची नावे किमतीसह देण्यात आली आहेत.

प्रबोधन गोरेगाव ग्राहक सहकारी संस्था मर्यादित (पीजीएमएस) ही गेल्या पाच वर्षांपासून जेनेरिक औषधांचा प्रसार करत आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले, स्मार्टफोनचा जमाना असल्याने अॅप लाँच करण्याचे ठरवले. हे अॅप इंग्रजी आणि मराठीत उपलब्ध असून गुगल प्लेस्टोअरवरून हे डाऊनलोड करता येईल. अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यात आपला पत्ता आणि फोन नंबर देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर ज्या आजारावर औषध हवे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर औषधांची यादी येईल. त्याची बाजारातील किंमत आणि प्रबोधनची किंमत मिळेल. बाजारात एखादे औषध १०० रुपयांना असेल तर ते आम्ही १५ ते २० रुपयांना देतो. सध्या मुंबईत ही सोय उपलब्ध असून लवकरच राज्यभरात सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

कमी दरात औषधे
प्रबोधनकडे अलेम्बिक, अल्केम, बायोकेम, कॅडिला, सिप्ला, एल्डर, जॅक्सन, संत मायकेल बायोटेक, मायकेल थेमिस, उनिचेन वोकार्त, ओमेगा, ओकासा, लुपिन, मेडली आदी औषध कंपन्यांची औषधे असून ती अत्यंत कमी दरात उपलब्ध करून दिली जातात.
बातम्या आणखी आहेत...