मुंबई – बॉलिवूडचा दबंग अभिनेता
सलमान खान याने आपल्या चाहत्यांसाठी एक खास अशी नोकरीसंबंधित वेबसाईट नुकतीच लाँच केली आहे.
सलमान खानचा 'किक' हा चित्रपट येऊ घातला आहे. या आगामी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सलमानने
ट्विटरवर नोकरी संबंधित नव्या वेबसाईटची माहिती दिली आहे. 'Being Human' या समाजसेवी संस्थेच्या मदतीने सलमान नोकरी अभियान उपक्रम राबवणार आहे.
आपले
फेसबुक खाते हे फक्त टाईमपास करण्यासाठी नाही तर त्याच्या मदतीने वेगवेगळ्या नोक-यांचा शोध घ्या. http://beinghumanworkshop.com #Beinghumanjobs असे सलमानने ट्विट केले आहे. माझ्या चाहत्यांना व सोशल नेटवर्क साईटवरील ज्या फॉलोअर्सना नोकरीची गरज आहे. त्याच्या नोकरीच्या शोधाचे काम करू व नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करू असेही सलमानने टि्वट केले आहे.
छायाचित्र- सलमान खानने केलेले टि्वट...