आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई कोस्टल रोडला पर्यावरण खात्याचा ग्रीन सिग्नल, सेना-भाजपात श्रेयवाद?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो उद्धव ठाकरे व फडणवीस... - Divya Marathi
फाईल फोटो उद्धव ठाकरे व फडणवीस...
मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अखेर मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटवरून दिली आहे. कोस्टल रोडमुळे मुंबईतील वाहतुक कोडींची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान, कोस्टल रोडच्या मंजुरीचे श्रेय घेण्यावरून भाजप व शिवसेना आमने सामने आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळेच कोस्टल रोड मार्गी लागल्याचे सेनेचे म्हणणे आहे तर भाजपनेही केंद्रातील प्रकाश जावडेकरांमुळे मार्गी लागल्याचे अप्रत्यक्ष सांगत श्रेय घेतले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांची घोषणा करताना सांगितले की, कोस्टल रोडला पाच महिन्यांत परवानगी देऊ असे आम्ही सांगितले होते. प्रत्यक्षात आम्ही तीन महिन्यातच मंजूरी मिळवली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. याबाबचा अंतिरम आराखडा 15 जून रोजी प्रसिद्ध केला जाईल. यानंतर सूचना व हरकतींचा विचार करून 15 ऑगस्टपर्यंत अंतिम आराखडा तयार केला जाईल. यानंतर पुढील तीन वर्षात अलिबाग ते विरार या दरम्यानचा 30 ते 35 किलीमीटर लांबीचा हा कोस्टल मार्ग पूर्ण करण्याचे आमच्यापुढे आव्हान असेल. पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रकल्प मार्गी लावून मुंबईकरांना एक सुरेख भेट दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जावडेकर व मोदींना याचे श्रेय देऊन शिवसेनेवर कुरघोडी केल्याचे मानले जात आहे. आपल्याला माहित असेलच की, विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'व्हिजन डॉक्युमेंट'मधून 'किनारपट्टी रस्ता' (कोस्टल रोड)चे स्वप्न दाखवले होते. मात्र, त्यांचे स्वप्न फडणवीस पूर्ण करीत असले तरी त्यांनी सेना किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतेही भाष्य केले नाही.
या प्रकल्पासाठी सुमारे 30 हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. मात्र, हा प्रकल्प आता मुंबई महापालिकेकडून राज्य सरकारने आपल्या हातात घेतला आहे. मुंबई महापालिकेने यासाठी प्राथमिक गरज म्हणून 200 कोटींची तरतूद केली होती. त्यामुळे आगामी काळात भाजप व शिवसेनेत श्रेयवादाचे राजकारण रंगणार आहे. या मुद्यांवरून भाजप-शिवसेनेत कोणतेही मतभेद नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. हे सरकार भाजप-शिवसेनेच्या युतीचे आहे त्यामुळे श्रेय घेण्याचा किंवा वाद होण्याचे कोणतेही कारण नाही असे फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तर शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी आमच्यात श्रेयाचा कोणताही वाद नाही. उद्धव ठाकरे यांचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य सरकारने पावले टाकली आहेत. मुंबईकर जनतेचा त्यात फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे वाचा, फडणवीस यांनी काय टि्वट केले आहे...
दिल्ली दौ-यावर असलेल्या फडणवीसांनी कोणाकोणाची भेट घेतली... पाहा छायाचित्रांतून पुढे....
बातम्या आणखी आहेत...